Ad will apear here
Next
पहिले प्रेम

एकुलत्या लहान मुलाला घेऊन पत्नी दोन महिन्यांसाठी माहेरी जावी आणि आपलं पहिलं प्रेम, आपली प्रेयसी, आपल्या घरी राहायला यावी. असा प्रसंग स्वप्नात किंवा चित्रपटातच घडू शकतो. पण इथे करूणा खरोखरच देवदत्तच्या घरी राहायला येते. 

माझ्यासारख्या बॅरिस्टर होऊ पाहणाऱ्या शिवाय ज्याच्यावर आपलं खरं प्रेम आहे अशा तरुणाला नाकारून करूणाने एका ड्रॉइंग मास्तरशी का लग्न केलं असेल? देवदत्तला हा प्रश्न नेहमी पडत असे. 
करूणेने नाकारलं म्हणून देवदत्त एक सोज्वळ मुलगी पाहून तिच्याशी लग्न करतो व नव्या आयुष्याची सुरूवात करतो. देवदत्तची पत्नी इतकी चांगली असते की त्याला करुणेची कमतरता जाणवत नाही, पहिल्या प्रेमाची आठवण अधूनमधून येत असली तरी.
 
आता आपला संसार सुखाचा चालला असताना अचानक करूणा तिच्या पतीला घेऊन देवदत्तच्या घरी येते काय, पतीशी भांडून त्याला तिथून एकटाच पुढे पाठवते काय, आणि देवदत्तची पत्नी असल्यासारखी त्याच्याच घरात राहते काय? सगळंच अजब! 

देवदत्त दिवसभर ऑफिसला जायचा आणि करूणा घरी थांबायची. त्या संध्याकाळी घरी आल्यावर तो करूणेला घेऊन समुद्रकिनारी जाऊन बसला. त्यांना त्यांचे प्रेमालापाचे जुने दिवस आठवू लागतात. करूणा वाळूवर काहीतरी लिहून पुसत असते. देवदत्त तिरप्या नजरेने तिकडे पाहतो तर करूणा पुसत असलेल्या शब्दांतील 'दत्त' ही दोन अक्षरे त्याला स्पष्ट दिसतात. 

करूणेचं अजूनही देवदत्तवर प्रेम असतं. त्याच्याशी लग्न न करण्याच्या निर्णयाचा तिला पश्चाताप झालेला असतो. 

त्या रात्री दोघेही वेगवेगळ्या खोलीत झोपलेले असतात. अचानक देवदत्तला करूणेच्या खोलीतून पहिल्यांदा सुस्कारे सोडल्याचा, मग खाट वाजल्याचा व शेवटी त्या खोलीत करुणा येरझाऱ्या घालत असल्याचा आवाज येतो. याचा अर्थ काय? 

'करूणाऽ' त्या खोलीच्या दाराशी जाऊन देवदत्त आवाज देतो... 
‘‘पहिलं प्रेम हा एक ज्वालामुखी आहे! तो शांत झालासा वाटला, तरी पुन्हा केव्हा पेटेल, याचा नेम नसतो!’’ 

- विजय निंबाळकर

पहिले प्रेम हे पुस्तक बुकगंगा डॉट कॉम वरून २५% सवलतीत घरपोच मागवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा 8888 300 300 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा.

https://www.bookganga.com/R/4V00G
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZXPDL
Similar Posts
पहिले प्रेम एकुलत्या लहान मुलाला घेऊन पत्नी दोन महिन्यांसाठी माहेरी जावी आणि आपलं पहिलं प्रेम, आपली प्रेयसी, आपल्या घरी राहायला यावी. असा प्रसंग स्वप्नात किंवा चित्रपटातच घडू शकतो. पण इथे करूणा खरोखरच देवदत्तच्या घरी राहायला येते.
कोल्हाट्याचं पोर किशोरचा बाप करमाळ्याचा आमदार नामदेवराव जगताप. किशोरच्या लहान भावाच्या बाप मराठवाड्यातला धारूरकर नावाचा वयस्कर माणूस. आणि आता किशोरची आई सोनपेठमधला कृष्णराव वडकर या सावकाराला 'मालक' करून बसलेली. अशा बाईला आई तरी कसं म्हणायचं? पण कोल्हाट्याच्या बायकांचं जीवन असंच असतं. विशेषतः गावोगावच्या पार्टीत नाचणाऱ्या बायकांचं
बलुतं पुरुषांनी रांडबाजी करणं म्हणजे छातीवर मेडल अडकवणं. मारूतीच्या दृष्टीने तोच खरा पुरुषार्थ. तसंही आता कुठं लढाया होताहेत?
हाच माझा मार्ग 'साऊंड, कॅमेरा, ॲक्शन!' दिग्दर्शकाने सूचना देताच त्याने भोकाड पसरलं. सचिन चित्रपटसृष्टीत अगदी 'त्या वयापासून' आहे. बाल कलाकार के मुख्य अभिनेता, संकलक ते दिग्दर्शक असा प्रवास करत; हिंदी, मराठी चित्रपटसृष्टी गाजवत सचिनचा हा प्रवास सुरू राहिला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language